अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding aided teachers/non-teaching staff issued on 20.03.2026 ] : दिनांक 25.08.2025 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणेबाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांच्या मार्फत दिनांक 20.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेला आहे कि ,शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 नुसार टप्पा अनुदान व नव्याने 20 टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा , वर्ग / तुकड्या संदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत , निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच शासन निर्णय दिनांक 25.08.2025 मधील अटी / शर्तीनुसार 20 टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा व तुकड्यांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्ताव शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे 05 दिवसात ..

सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत , तसेच शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर प्रकरणी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनास सादर करण्याचे तसेच शालार्थ आयडी अभावी 20 टक्के अनुदान करीता पात्र शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन अदा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभागीय शिक्षण संचालक ( सर्व ) , शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.सर्व , शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांची राहील असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment