आर्थिक संकटामुळे EMI भरु शकत नसाल तर , EMI होल्ड / कमी करण्याचे सुविधा मिळते का ?

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ If you are unable to pay your EMI due to financial hardship, is there a facility to hold or reduce your EMI? ] : आपण कर्जाची परतफेड नियमित करु शकत नसाल अथवा काही हप्ते होल्ड करण्याचे पर्याय बॅकेकडून मिळते का ? याबाबत सविस्तर माहीती या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .

कर्ज ( Loan ) : काही विशिष्ट कामासाठी बँकेकडून कर्ज पुरवठा केले जाते , सदर कर्जाची परतफेड आपण मासिक , त्रेमासिक किंवा वार्षिक पद्धतीने करत असतो . तशा प्रकारचे प्रयोजन कर्ज घेतावेळीच केली जाते .

EMI कमी करण्याची सुविधा मिळते का ? : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमावली नुसार , एखादा ग्राहक आर्थिक संकटात असताना , ईएमआय कमी करण्याची सुविधा दिली जाते . या करीता आपणांस सदर बँकेत जावून आवेदन देवून परतफेडीचा कालावधी वाढवून तशी सुविधाचा लाभ घेवू शकता .

याकरीता आपणांस आपली आर्थिक संकटात असल्याचा पुरावा द्यावा लागेल , व बँक व्यवस्थापकाच्या परवानगीने आपला ईएमआय करुन करुन घेवू शकता . याकरीता काही अतिरिक्त शुल्क आकारले जावू शकेल .

EMI होल्ड करण्याची सुविधा मिळते का ? : ग्राहक आर्थिक संकटात असताना खाजगी बँका / वित्तीय संस्था मार्फत कर्जाचे हप्ते थकित ( Hold ) ठेवण्याची सुविधा दिली जाते , परंतु याकरीता काही अतिरिक्त चार्जेस जातात . तर सरकारी बँकांचे कर्जाचे हप्ते थकल्यास आपल्या खात्यास होल्ड लावले जाते , जोपर्यंत हप्याची रक्कम भरली जात नाही तापर्यंत आपल्या खात्यावरील होल्ड काढले जात नाही .

Leave a Comment