Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ How much salary increase will there be in the 8th Pay Commission for state employees? ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु केली आहे . केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल नविन वेतन आयोग लागु केला जाईल .
केंद्र व राज्य सरकारच्या किमान वेतन मध्ये फरक असतो , जसे कि सातवा वेतन आयोगानुसार केंद सरकारचे किमान वेतन 18,000/- रुपये होते , तर राज्य सरकारचे किमान वेतन हे 15,000/- रुपये होते. परंतु फिटमेंट फॅक्टर 2.57 प्रमाणेच सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे .
फिटमेंट फॅक्टर : आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचारी युनियनच्या मागणीनुसार , फिटमेंट फॅक्टर मध्ये किमान 02 पट वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . सदर किमान 02 पट वाढीनुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये किती वाढ होईल ? याबाबतचा अंदाजित सुधारित वेतनश्रेणीचा सविस्तर तक्ता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
Pay Level | 7th pay commission ( मुळ वेतन ) | फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य किमान मुळ वेतन |
S – 01 | 15,000 | 30000 |
S – 02 | 15300 | 30600 |
S – 03 | 16600 | 33200 |
S – 04 | 17100 | 34200 |
S – 05 | 18000 | 36000 |
S – 06 | 19900 | 39800 |
S – 07 | 21700 | 43400 |
S – 08 | 25500 | 51000 |
S – 09 | 26400 | 52800 |
S – 10 | 29200 | 58400 |
S – 11 | 30100 | 60200 |
S – 12 | 32000 | 64000 |
S – 13 | 35400 | 70800 |
S – 14 | 38600 | 77200 |
S – 15 | 41800 | 83600 |
वरील तक्त्यानुसार आठवा वेतन आयोगानुसार सुधारित अपेक्षित वेतनश्रेणी लागु केली जाईल . यानुसार किमान वेतन मध्ये चक्क दुप्पट पटीने वाढ होणार असली तरी , काही देय भत्ते परत शुन्य टक्के होणार आहेत .जसे महागाई भत्ता परत शुन्य टक्के होईल .