Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ good news for state employee / pensioners ] : राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठ्या महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
निवृत्तीचे वय वाढीबाबत पुनर्विचार : मिडीया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे वरुन 62 वर्षे करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे . सदर प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे वरुन निदान 02 वर्षे वाढवून 60 वर्षे करण्याचा पुनर्विचार राज्य सरकार मार्फत करण्यात येईल .
डी.ए वाढ डिसेंबर अखेर : राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ( नगरपालिका , नगरपरिषदा ) यांच्या निवडणुका कामकाज सुरु आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलैची डी.ए वाढीस विलंब होत आहे . निवडणुक कामकाज पुढील आठवड्यापर्यंत पुर्ण होईल . यामुळे डिसेंबर अखेर डी.ए वाढीचा अधिकृत्त निर्णय होण्याची शक्यता आहे .
नविन वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे , त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल नविन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे . परंतु याकरीता राज्य कर्मचाऱ्यांना जवळपास सन 2029 पर्यंत वाट पाहावी लागेल .
सेवापुस्तक ऑनलाईन : सध्या राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक ऑनलाईन करण्याचे काम पहिल्या टप्यात सुरु झाले आहे . पुढील 5 वर्षापर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक हे ऑनलाईन केले जाणार आहेत .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !