Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ General Transfers of Government Employees Suspended Until March 31, 2027 – Central Government Directs All States ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या ह्या दि.31.03.2027 पर्यंत स्थगिती देण्याचे केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत .
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी देशातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या दिनांक 31.03.2027 स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत .
सदर पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , देशांमध्ये आगामी जनगणनेची तयारी सुरु असल्याने , सदर जनगणनेच्या कामकाजांमध्ये सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना विविध पदांवर नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत .
तसेच सदर पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि, जोपर्यंत जनगणनेचे कामकाज पुर्ण होत नाहीत , तोपर्यंत सदर नियुक्त्या रद्द करण्यात येवू नयेत . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना दि.31.03.2027 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे .
ज्यामुळे जनगणना या राष्ट्रीय कामकाजांमध्ये कोणतेही प्रशासकीय व्यत्यय निर्माण होणार नाही . यामुळे जनगणना 2027 करीता नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची जनगणना पुर्ण होईपर्यंत म्हणजेच दिनांक 31.03.2027 पर्यंत बदली केली जाणार नाही .
- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR