कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी समितीचे गठण  ; GR निर्गमित दि.04.06.2025

@marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Formation of a committee to resolve various issues of employees ] : कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्‍य शासनांच्या शालेय शिक्षण विभागांकडून दि.04.06.2025 रोजी समितीची स्थापना करुन कामकाजाचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहेत .

दि.22.07.2024 रोजी मा.मुख्यमंत्री यांच्या समवेतन समग्र कर्मचारी संघटना सोबत बैठक संपन्न झाली , यामध्ये समग्र शिक्षा योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली . याबाबत समितीचे गठण करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

सदरच्या निर्णयानुसार समग्र शिक्षा योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समितीची गठण करण्यास सदर निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .

सदर समितीचे अध्यक्ष हे श्री.संतोष कुमार अपर मुख्य सचिव तथा विशेष कार्य अधिकारी , मंत्रालय मुंबई हे असून , इतर 13 सदस्याची निवड करण्यात आलेली आहे . यांमध्ये कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा देखिल समावेश आहे .

सदर समितीने करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन तसेच इतर प्रश्न बाबत अन्य राज्यांमध्ये सदर करार पद्धतीने कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांना देण्यात येणारे मानधन तसेच त्यांच्या अन्य प्रकारच्या सेवाशर्ती याबाबत अभ्यास करुन राज्य शासनांस तीन महिन्यात अवधीमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *