Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Due to the red alert of rain, holidays have been declared for schools, daycare centers, and colleges in this district of the state. ] : सध्या राज्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढत आहे . यामुळे प्रशासनांकडून आवश्यक त्या ठिकाणी सोयी – सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत .
सध्या राज्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र , कोकण मध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे . तर विदर्भांमध्ये पावसाने रौद्र रुप धारण केले आहे . यामुळे जिल्हा प्रशासनांकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
या दोन जिल्ह्यांतील शाळा / महाविद्यालये बंद : आज दिनांक 25 जुलै रोजी हवामान खात्यांकडून गडचिरोली , भंडारा , चंद्रपुर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . या जिल्ह्यांत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांतील शाळा , अंगणवाड्या , महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग शिकवण्यांना आज दिनांक 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . याबाबत चंद्रपुर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नितीन व्यवहारे व भंडारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी आदेश जारी करण्यात आले आहेत .
अतिपर्जन्यमानामुळे जन-जीवनांवर विपरीत परिणाम होवू नये , याकरीता सदर निर्णय घेण्यात आलेला आहे . तर तातडीच्या बाबी म्हणून NDRF पथके तैनात करण्यात आले आहेत .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..