दररोज / सारखा चहा पिणे , शरीरासाठी ठरतो घातक ; जाणून घ्या सविस्तर !

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Drinking tea every day is harmful to the body; know in detail.. ] : दररोज / सारखा चहा पिणे आपल्या शरीरासाठी घातक ठरतो , यामुळे चहा पिणे टाळावा असे तज्ञांचे मत आहे .

आजच्या काळांमध्ये आपण सकाळी उठल्या – उठल्या चहा – पावने सुरुवात करतो . यामुळे आपणांस ॲसिडिटी सारखे आजार जडत आहेत . ॲसिडिटी आजार घातक असून , आजच्या काळांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे .

लहान मुलांना नियमित चहा पाजल्याने त्यांना लहान वयात देखिल ॲसिडीटी होण्याची प्रमाण वाढत आहे . याशिवाय चहा पिल्याने भुक कमी होते , यामुळे आपल्या शरीरास आवश्यक जिवनसत्वे मिळत नाही .

चहामुळे हृदयाची गती वाढणे , डोकेदुखी , बद्धकोष्ठता या सारखे आजार जडते . परिणामी हृदयाचे विकास जडण्याचे प्रमाण वाढते . अचानक हृदयाचे ॲटॅक येण्याची भिती वाढते . यामुळे नियमित चहा शक्यता टाळावा .

चहा हा काही प्रमाणांमध्ये आपल्या मानवी शरीरास लाभदायक ठरतो , परंतु दैनिक / नियमित स्वरुपात सेवण करणे धोकादायक ठरतो . व लहान मुलांना कमी वयात चहा पाजणे धोकादायक आहे .

जास्तच चहाची तलप असल्यास कोरा व बिना साखरेचा चहा घ्यावा , जे कि शरीराला मोठ्या प्रमाणात ईजा करणार नाही . याशिवाय दुधाचा चहा पिणे शक्य तेवढा टाळण्याचा प्रयत्न करावा .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *