Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ District-wise grant distribution to pay salaries/allowances of officers/employees ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते भागविण्यासाठी जिल्हा निहाय अनुदान वितरण करण्यात आले आहे , या संदर्भात ग्राम विकास विभाग मार्फत दि.05.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन मधील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता आवश्यक प्रतिमाह वेतनाकरीता सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेवून सन 2025-26 करीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ..
अदा करण्यासाठी 3,85,00,000/- ( अक्षरी – तीन कोटी पंच्याऐशी लाख रुपये फक्त ) इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
जिल्हा निहाय निधीचे वितरण विवरणपत्र खालीलप्रमाणे पाहु शकता ..

सदरचा खर्च हा ग्रामविकास विभाग इतर ग्रामीण विकास कार्यक्रम , जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण – प्रशासन , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – प्रशासकीय खर्च राज्य पुरस्कृत योजना , 36 – सहायक अनुदाने या लेखा शिर्ष अंतर्गत सन 2025-26 च्या तरतुदीमधून अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !