@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ Distribution of funds for the salaries of employees for the month of July; GR issued on 17.07.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्यांचे वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.17.07.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2025-26 या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरणास मंजूरी देण्यात आली आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदा , माध्यमिक शिक्षण , माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्या , सर्वसाधारण शिक्षण , सैनिकी शाळा व महाविद्यालये , आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम ..
सर्वसाधारण शिक्षण , माध्यमिक शिक्षण , युवक कल्याण कार्यक्रम , क्रिडा व खेळ , महाराष्ट्र राज्य क्रिडा परषद मार्फत नोंदणीकृत क्रिडा संस्था , आदि लेखाशिर्षाखाली निधींचे अनुदान वितरीत करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : नवीन वेतन आयोग संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट !
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वेतन व इतर देयके अदा करीत असताना , वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे . याशिवाय ज्या लेखाशिर्षाकरीता निधीचे वितरण केले आहेत , त्याच लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर निधी वितरणांच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहीत कालावधीत अदा केले जाणार आहेत .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !