कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच निवृत्तीवेतन व भत्ते करीता निधी वितरण ; GR निर्गमित !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [  Distribution of funds for salaries and allowances of employees as well as pensions and allowances ] : जिल्हा  परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारितील यांत्रिकी उपविभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद स्तरावर निर्मित पदावर हातपंप / विजपंप देखभाल दुरुस्ती करीता कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच निवृत्तीवेतन व भत्ते करीता निधी वितरण करणेबाबत दि.10.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार भुजल व विकास यंत्रणाा पुणे यांच्याकडून प्राप्त माहीतीनुसार 32 जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट 2024 ते माहे फेब्रुवारी 2025 या सात महिन्यांकरीता वेतन व सेवानिवृत्ती वेतन देण्याच्या अनुषंगाने , कर्मचाऱ्यांची सुधारित आकडेवारी प्राप्त झाली आहे .

व प्राप्त आकडेवारीनुसार कार्यरत कर्मचारी संख्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या व एकुण कर्मचारी संख्या नुसार वेतन व  सहायक अनुदाने वितरीत करण्यात येत आहेत .

जिल्हा परिषद निहाय कर्मचारी संख्या तसेच माहे ऑगस्ट 2024 ते माहे फेब्रुवारी 2025 करीता वितरीत अनुदाने तक्ता सदर निर्णयांमध्ये दर्शविण्यात आलेला आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment