मुख्यमंत्री लाडका भाऊंचे थेट नोकरीच्या दिशेने वाटचाल ; नियमित नोकरी , मानधन वाढ करीता महाआंदोलन !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Chief Minister Ladka Bhau’s direct path towards employment ] : मुख्यमंत्री लाडका भाउंचे थेट नोकरीच्या दिशेने वाटचाल होत आहे .मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत 1 लाख पेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार दिल्याचा गाजावाजा निवडणुकीपुर्वी सरकारने केला ..

परंतु सदर योजनेचे उद्देश नेमका काय ? या योजनेतुन केवळ गाजावाजा साध्य करायचे होते का ? असा सवाल लाडक्या भावांकडून विचारला जात आहे . सध्या सदर लाडक्या भावांची मुदत संपत आहे , यामुळे पुढे रोजगार साठी लाडक्या भावांची धावपळ सुरु आहे .

निवडणुकीपुर्वीचे योजनेचे उद्देश काय ? : राज्याचे विधानसभा निवडणुका पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते कि , तब्बल 1,03,000 लाडक्या भावांना प्रशिक्षण मिळत असून , त्यांना पुढे रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिले जातील असे स्पष्ट करण्यात आले होते .

लाडक्या भावांची मागणी काय ? : लाडक्या भावांची अशी मागणी आहे कि , प्रशिक्षण कार्य पुर्ण झाले आहे , आता रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात यावी . तसेच मानधनांमध्ये देखिल वाढ करण्यात यावी . अन्यथा सदर योजनांची मुदत वाढ केली जावी अशी मागणी लाडक्या भावांकडून करण्यात येत आहे .

अन्यथा महाआंदोलन : लाडक्या भावांच्या हक्कासाठी सांगलीचे श्री.तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 50 हजार पेक्षा अधिक लाडक्या भावांच्या समवेत आझाद मैदान येथे छत्री महा-आंदोलन आज दि.14 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Comment