Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Central Government approves new National Sports Policy 2025 ] : केंद्र सरकारकडून नविन क्रिडा धोरणांस नुकतेच मंजूरी देण्यात आलेली आहे , या धोरणांमधील प्रमुख बाबी या लेखांमध्ये खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
भारताला जागतिक पातळीवर क्रिडा क्षेत्रांमध्ये प्रविण्यता मिळविण्यासाठी सन 2001 चे क्रिडा धोरण बदलुन नविन क्रिडा धोरण 2025 ला मुंजुरी देण्यात आलेली आहे . या धोरणांचे मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे सन 2036 पर्यंत देशाला क्रिडा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक पदके मिळवून देण्याचा मानस आहे .
प्रमुख 05 बाबी : 1) क्रिडा क्षेत्रात उत्कृष्टता– जागतिक पातळीवर देशाचे क्रिडा क्षेत्र उत्कृष्टता आणण्यासाठी गाव ते आंतरराष्ट्रीय स्तर पर्यंत खेळाडूंना घडविण्याचा मानस या धोरणांमध्ये नमुद आहे .या करीता ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये स्पर्धात्मक रित्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहेत .
02) आर्थिक विकास : देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहेत , ज्यामुळे आर्थिक विकासाला चालन मिळणार आहे . याकरीता खाजगी तसेच पीपीपी मॉडेलच्या माध्यमातुन गुंतवणूकस आकर्षिक केले जाणार आहेत .
03) क्रिडा मधून सामाजिक विकास : यांमध्ये दिव्यांग , आदिवासी , दिव्यांग , तसेच आर्थिक दृष्टया दुर्बल घटक , महिलांकरीता विशेष येाजनांचे आयोजन करुन सामाजिक विकास साधण्यात येणार आहे .
04)जीवनशैली व जनआंदोलन कृती योजना : या धोरणांच्या माध्यमातुन देशातील क्रिडा व फिटनेस संस्कृती अभियान राबविण्यात येणार आहेत , तसेच शाळा / महाविद्यालय करीता फिटनेस इडेक्स तयार केले जाणार आहे .
05) शिक्षणास जुळवणुक : क्रिडा क्षेत्रास शिक्षणांशी जुळवून घेण्यात येणार आहेत . यांकरीता क्रिडा प्रशिक्षक तसेच शिक्षकांना विशेष प्रशिक्षणांचे आयोजन केले जाणार आहेत .