Marathisanhita प्राची पवार प्रतिनिधी [ Bank of India’s cheapest security insurance policy with insurance cover of Rs. 20 lakhs for just Rs. 1,999/-! ] : बँक ऑफ इंडियाचे सर्वात स्वस्त सुरक्षा विमा पॉलिसी कार्यरत आहे , ज्यांमध्ये आपणांस फक्त 1999/- रुपयांमध्ये तब्बल 20 लाख रुपयांचे विमा कवच मिळते .
या पॉलिसीमध्ये आपणांस वार्षिक फक्त 1,999/- रुपये भरायचे आहेत . यांमध्ये आपणांस वार्षिक मेडिक्लेम सुरक्षा मिळते . यांमध्ये वैयक्तिक अपघाती विमा , रुग्णालयीन खर्च तसेच रुग्णालयामध्ये दाखल झाल्याचा खर्च समाविष्ट आहे .
पॉलिसीचे खास वैशिष्ट्ये : या पॉलिसीचा कालावधी हा 1 वर्षाचा असून , वय मर्यादा 18-60 वर्षे पर्यंतच्या या पॉलिसीचा लाभ घेता येतो . ही योजना केवळ स्वत : साठी घेता येईल . अपघाती मृत्यु झाल्यास 20 लाख रुपये कवच मिळते , तर रुग्णालयी खर्च करीता 2 लाख रुपये पर्यंत खर्च मिळेल तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ..
प्रतिदिन 4,000/- रुपये तर आयसीयु करीता 8,000/- रुपये पर्यंत खर्च मिळेल . रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी 30 दिवसापर्यंत खर्च मिळेल . तर डिसचार्ज मिळाल्याच्या नंतर 60 दिवसापर्यंत खर्च मिळेल .
अवयव दाता कव्हर करीता तसेच डे केअर उपचार करीता 2 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण पुर्तता मिळते . वैयक्तिक उपचार अंतर्गत आंररुग्ण काळजी करीता 40,000/- रुपये पर्यंत खर्च तर अपातकालीन रस्ता रुग्णवाहिका भारतामध्ये करीता 1000/- रुपये पर्यंत खर्च पुर्तता समाविष्ठ आहे .
सदर खर्चाच्या 80 टक्के खर्च सदर सेहत सुरक्षा योजना अंतर्गत देय राहील . या पॉलिसीचा लाभ घेण्याकरीता आपल्या जवळच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट द्यावी .