@marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Local holiday declared in the state on 02.12.2025 ] : दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी राज्यात स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत राज्य सरकारच्या उद्योग उर्जा व खनिकर्म विभाग मार्फत दि.28.11.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , निवडणुक होणा-या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार / अधिकारी / कर्मचाऱ्यांना मग ते कामाच्या निमित्ताने होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच दिनांक 02.12.2025 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे.
सदरचा निर्णय हा राज्यातील सर्व उर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणारे सर्व आस्थापना यांमध्ये खाजगी आस्थापने उदा . सर्व दुकाने , हॉटेल , खाद्यगृहे , नाट्यगृहे , व्यापार , उपक्रम , तंत्रज्ञान कंपन्या , शॉपिंग सेंटर रिटेलर्स इ.
अपवाद : मोठ्या प्रमाणात नुकसान होईल , जसे धोकादायक अथवा लोकोपयोग सेवा मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना मतदान हक्क बजावण्यासाठी 2-3 तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
निर्णयाचे उल्लंघन झाल्यास होणार कार्यवाही : सदर निर्णयाचे उल्लंघन केल्यास मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास , मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ..
संबंधित आस्थापना , मालकावर कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026