Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Regarding sanction of phased grant to teachers/non-teaching staff working on subsidized basis, GR issued on 25.08.2025 ] : राज्यातील अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करणेबाबत , शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 25 ऑगस्ट 2025 मार्फत महत्वपुर्ण शसन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील खाजगी विना अनुदानित व अशंत : अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
20 टक्के टप्पा अनुदान : दि.06.02.2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकषांची पुर्तता करणाऱ्या राज्यातील 202 प्राथमिक शाळा , 1549 वर्ग / तुकड्या व त्यावरील 2728 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , 272 माध्यमिक शाळा , 1104 वर्ग / तुकड्या व त्यावरील 5254 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच 1605 उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय , 1530 वर्ग / तुकड्या / अतिरिक्त शाखा व त्यावरील 7877 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांस 20 टक्के टप्पा अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
40 टक्के टप्पा अनुदान : दि.06.02.2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकषांची पुर्तता करणाऱ्या राज्यातील 212 प्राथमिक शाळा , 738 वर्ग / तुकड्या व त्यावरील 2038 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , 224 माध्यमिक शाळा , 310 वर्ग / तुकड्या व त्यावरील 2866 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , 1435 उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय 1513 वर्ग / तुकड्या / अतिरिक्त शाखा व त्यावरील 9055 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 20 टक्के वरुन 40 टक्के टप्पा अनुदान मंजूर करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
60 टक्के टप्पा अनुदान : दि.06.02.2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकषांची पुर्तता करणाऱ्या राज्यातील 406 प्राथमिक शाळा , 1226 वर्ग / तुकड्या व त्यावरील 3836 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , 1488 माध्यमिक शाळा , 966 वर्ग / तुकड्या व त्यावरील 15908 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 40 टक्के टप्पा अनुदान वरुन 60 टक्के टप्पा अनुदान वाढविण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025