पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Pension Switch Facility Government Letter issued by the Ministry of Finance on 25.08.2025 ] : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजीच्या अधिसुचना द्वारे अर्थ मंत्रालयाने अधिसूचना केलेल्या युनिफाईड पेन्शन योजना चा संदर्भ घेण्याचे निर्देश अधोस्वाक्षरीकर्त्यांना देण्यात येत आहेत .

यानुसार असे सुचित करण्यात आले आहेत कि ,युपीएस चा पर्याय निवडलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युपीएस वरुन एनपीएस मध्ये एक वेळ स्विच करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल . ही स्विच सुविधा युनिफाईड पेन्शन योजनाचा पर्याय निवडलेल्यांना ..

सेवानिवृत्तीच्या तारखेच्या एक वर्षे आधी अथवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत निवृत्तीच्या निवृत्तीच्या मानलेल्या तारखेच्या तीन महिने आधी लागु असेल तेव्हा कधीधी वापरता येईल . असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच राजीनामा व नियम 56 J च्या प्रकरणांमध्ये आवश्यकतेनुसार किरकोळ बदलांसह अशाच तरतुदी केल्या जातील असे नमुद करण्यात आले आहेत . जर वरील नमुद वेळेनुसार स्विच सुविधा वापरली गेली नाही तर कर्मचारी डीफॉल्टनुसार युपीएस अंतर्गत सुरु राहील अशी बाब यांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत तब्बल 841 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

त्याचबरोबर शिक्षेसाठी काढून टाकणे , काढून टाकणे अथवा सक्तीची निवृत्ती घेतल्यास अथवा शिस्तभंगाची कारवाई सुरु असलेल्या अथवा विचारात असलेल्या प्रकरणांमध्ये स्विच सुविधा दिली जाणार नाही , असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच स्विच सुविधा उपलब्ध झाल्याच्या नंतर PFRDA नियम अंतर्गत संबंधित कर्मचारी हे खात्रीशीर पेमेंट व युपीएस लाभांसाठी पात्र राहणार नाही . डिफॉल्ट गुंतवणूक पद्धतीवर सरकारचे विभेदक योगदान 4 टक्के निश्चित केले जाईल व बाहेर पडण्याच्या वेळी व्यक्तींच्या एनपीएस कॉर्पसमध्ये जमा केले जाईल . असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment