Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding disciplinary action against employees of Group A to Group D cadre in the state issued on 25.08.2025 ] : राज्यातील गट अ ते ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कारवाई बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय कर्तव्ये पार पाडीत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या अपराध , गैरवर्तवणूक अथवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजिले जाते . तेव्हा अशी शिस्त भंग विषयक कार्यवाही करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निदेशित करणे अत्यावश्यक आहे .
याकरीता सर्व प्रशासकीय विभागांना त्यांचे नियंत्रण खालील शिस्तभंग विषयक प्राधिकारी घोषित करणे बाबत दिनांक 07 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहेत .सदर परिपत्रकानुसार किरकोळ शिक्षांचे अधिकार कोणास राहतील याची तरतुद करण्यात आलेली आहे .

तसेच यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 6 मध्ये नमुद केल्याप्रमाणे किरकोळ शिक्षेस मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात यावेत . तसेच शिस्तभंगविषय प्राधिकाऱ्यास विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करता येईल . असे यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .

- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025