Marathisanhita प्राची पवार प्रतिनिधी [ Salary/Pension for the month of August on 26th August; GR issued through Finance Department on 21.08.2025 ] : राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांचे माहे ऑगस्ट महिन्यांचे वेतन हे गणेशोत्सवापुर्वी प्रदान करणेबाबत राज्य सरकारच्या वित्त मार्फत दि.21.08.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , दिनांक 01.09.2025 रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्रदान दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
याकरीता वित्तीय नियम तसेच कोषागार नियम मधील तरतुदी तात्पुरत्या स्वरुपात शिथिल करण्यात येत आहेत . तसेच वेतन देयकांचे व निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन देयकांचे प्रदान दिनांक 26 ऑगस्ट 2025 या विहीत दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपुर्ण ..
वेतन / निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतन देयके यथास्थिती संबंधित कोषागार कार्यालयात सादर करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच सदरच्या तरतुदी ह्या जिल्हा परिषद , मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था , अकृषि विद्यापीठे / कृषी विद्यापीठे व त्यांच्या..
संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी / कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना देखिल लागु होतील असे नमुद करण्यात आले आहेत .

- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025