Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government employees can take extraordinary leave for a period of 03 months to 05 years, depending on their service period. ] : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना म.रा.नागरी सेवा नियम ( रजा नियमावली ) नुसार , असाधारण रजा नियम 63 नुसार 03 महीने ते 5 वर्षे पर्यंत रजा घेता येते .
असाधारण रजा म्हणजे काय ? : कर्मचाऱ्याची खाती इतर कोणत्याही प्रकारची रजा शिल्लक नसेल , अशा प्रसंगी कर्मचाऱ्यांस रजा आवश्यक असेल , तर त्यास असाधारण रजा दिली जाईल , तसेच थेट असाधारण रजेची मागणी केली तरी या प्रकारची रजा दिली जाते .
कायम ( स्थायी ) कर्मचारी : राज्य शासन सेवेत स्थायी / कायम झालेल्यांना रजा नियमावली नुसार कोणतीही रजा ही सलग 05 वर्षे पेक्षा अधिक काळाकरीता मंजूर करता येत नाही .
अस्थायी कर्मचारी : साधारणपणे राज्य शासने सेवेत कर्मचाऱ्यांने सलग 03 वर्षे समाधानकारक सेवा पुर्ण केल्यास , अशा कर्मचाऱ्यांस स्थायीत्व प्रमाणपत्र दिले जाते , सदर स्थायीत्व प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्यांना अस्थायी कर्मचारी म्हणून ग्राह्य धरण्यात येते . सदर अस्थायी कर्मचाऱ्यांना रजा नियम 63 नुसार असाधारण रजा किती दिवस व कोणत्या प्रयोजन करीता मिळते ? ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| सेवा कालावधी | रजा कालावधी | आधार , कारणे |
| कोणताही कर्मचारी | 03 महिना पर्यंत | वैद्यकिय प्रमाणपत्राशिवाय ( खाजगी कारणे . ) |
| 01 वर्षे सेवा नंतर | 06 महिना पर्यंत | वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे |
| 01 वर्षे सेवा नंतर | 12 महिना पर्यंत | मानसिक रोग , कर्करोग करीता |
| 01 वर्षे सेवा नंतर | 18 महिना पर्यंत | कृष्ठरोग , क्षयरोग ग्रस्तांसाठी |
| 03 वर्षे सेवा नंतर | 24 महिना पर्यंत | उच्च अभ्यासक्रम करीता |
| 05 वर्षे सेवा नंतर | 12 महिना पर्यंत | वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर . |
असाधारण रजा काळात पगार / इतर देय भत्ते मिळते का ? : असाधारण रजा काळांमध्ये कर्मचाऱ्यांस कोणतेही वेतन मिळत नसले तरी , सदर कर्मचारी रजेवर जाण्यापुर्वी घेत असणारे घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता हा रजा काळात सदर प्रयोजनावरच खर्च करीत असल्याचे प्रमाणपत्र व संबंधित प्राधिकरणांस खात्री पटल्यानंतर सदर घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ताचा लाभ घेता येईल .
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026