Payment : वेतन अनुदान शासन निर्णय GR दि.07.08.2025

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Wage Subsidy Government Decision GR dated 07.08.2025 ] : वेतन अनुदान अदा करणेबाबत , राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद आहे कि , वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .

यानुसार सन 2025-26 या आर्थकि वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागांकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे .

हे पण वाचा : भारतीय हवाई सेवा अंतर्गत ग्राउंड स्टाफ पदांच्या तब्बल 7,150 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , संचालन व प्रशासन , नगरपालिका शाळा मंडळा/ जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , माध्यमिक शाळा , शासकीय माध्यमिक शाळा , मुलींसाठी व मुलांसाठी शासकीय माध्यमिक शाळा , प्रौढ शिक्षण इ. लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे .

Leave a Comment