Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Supreme Court gives important/comforting decision regarding the working class ] : आजकाल अपघातीचे मृत्युचे प्रमाण अधिकच वाढले आहेत . शिवाय नोकरदार वर्गांमध्ये ताण – तणावाचे परिणाम देखिल अपघाती मृत्युचे कारण ठरत आहेत .
यामुळे सर्वोच्च न्यायालयांकडून स्पष्ट केल्यानुसार भरपाई कलम 1923 च्या 03 मधील तरतुदीनुसार कामामुळे निवासस्थान ते कामाचे ठिकाण दरम्यान प्रवास करताना होणारे अपघात हे देखिल ड्युटीचा भाग समजण्यात येईल . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई कायद्या अंतर्गत लाभ दिला जाईल .
याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मनोज मिश्रा व के.व्ही .विश्वनाथन यांच्या यापुर्वीच्या सदर संदर्भातील गोंघळ व अस्पष्टता दुर करुन निकाल दिला आहे . यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांचा ड्युटीसाठीचा प्रवास हा कर्तव्य काळ समजण्यात येणार आहे .
अपघाताची स्थिती , काळ , व स्थान आणि रोजगार यांच्या मध्ये संबंध प्रस्थापित असल्याने , कर्मचाऱ्यांना ड्युटीकरीता निवासस्थानापासुन ते कामाच्या ठिकाण पर्यंत जाण्यासाठी व परत येताना होणाऱ्या अपघाताचा समावेश हा कर्तव्य काळ / सेवेचा काळ समजण्यात येणार आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय … ( Retirement Age ) ; संक्षिप्त आढावा !
यांमध्ये एक साखर कारखान्यातील चौकीदार याचा दिनांक 22.04.2003 रोजी अपघाती मृत्यु झाला होता . त्याचे कामाचे तास हे सकाळी 03 ते सकाळी 11 पर्यंत होते . त्याचा ड्युटीवर जात असताना अपघाती मृत्यु झाला .
यामुळे त्याच्या वारसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या माहे डिसेंबर 2011 च्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सवोच्च न्यायालयांमध्ये दाखल केली व सर्वोच्च न्यायालयांमध्ये अखेर न्याय मिळाला व त्यांच्या वारसांना 3 लाख 26 हजार 140/- भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले .
- राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध ; GR निर्गमित दि.09.01.2025
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !
- जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत सुधारित महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.08.08.2025
- Post office yojana | शानदार योजनेमध्ये एकदाच करा गुंतवणूक आणि प्रत्येक महिन्याला मिळवा 10 हजार रुपये !
- Payment : वेतन अनुदान शासन निर्णय GR दि.07.08.2025