नोकरीला असणाऱ्या महिलांचा लग्नानंतर पगारावर कोणाचा अधिकार असतो ? नवरा कि माहेरचा ; जाणून घ्या कायदेशिर बाबी ..

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Who has the right to the salary of employed women after marriage? Husband or in-laws? ] : नोकरीवर असणाऱ्या महिलांचा लग्नानंतर पगारावर नेमका कोणाचा अधिकार असतो ? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल . याबाबत कायदेशिर बाबी नेमक्या काय आहेत . ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

आजच्या आधुनिक युगांमध्ये महिला देखिल पुरुषांच्या खाद्यांला खांदा देवून काम करित आहेत . सध्या देशाच्या उच्च पदावर महिला विराजमान आहेत . यामुळे कायदेशिर बाबींमध्ये लग्नानंतर महिलांच्या पगारावर नेमका कोणाचा अधिकार असतो ?

आपली संस्कृती पुरुष प्रधान असल्याने , पतीचे काम हे घरासाठी आवश्यक पैसा / संपत्ती कमवण्याची जबाबदारी असते . तर महिला ह्या चुल आणि मुल सांभाळण्यात व्यक्त असतात . परंतु आजच्या परिस्थिती बदलली आहे . महिला देखिल चांगल्या नोकरीवर काम करीत आहेत .

कायदेशिर बाबीनुसार महिलांना अधिक संरक्षण आहेत , यामुळे महिलांकडून जबरदस्तीने त्यांचा पगार घेणे हा गुन्हा आहे . भारतीय दंड संहिता 498 अ नुसार महीलांना जबरदस्तीने त्यांचा पगार करीता दबाव तसेच मानसिक छळ करता येत नाही . अन्यथा गुन्हा दाखल होवू शकतो .

हे पण वाचा : वेतनत्रुटी निवारण समिती अहवालातील सुधारित वेतनश्रेणी अमान्य करण्यात आलेल्या पदांना पुनश्च संधी ; जाणून घ्या सविस्तर .

अशा गुन्ह्यांकरीता तब्बल 5 वर्षांपर्यंची शिक्षा व गुन्ह्यांनुसार दंड देखिल ठोठावला जावू शकेल .यामुळे महिलांच्या पगारावर पुर्णत : त्याचा अधिकार असतो . त्यावर कोणीही जबरदस्ती करु शकत नाही .

निधनानंतर संपत्तीवर कोणाचा अधिकार : पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या मृत्युपत्रात नमुद व्यक्ती त्याच्या संपत्तीचा वारस असेल . जर मृत्युपत्र / सेवापुस्तकात तसे नमुद नसेल तर प्रथम वारस हा त्याचा पती त्यानंतर त्याचे मुलं हे वारस असतात .

Leave a Comment