Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Due to the red alert of rain, holidays have been declared for schools, daycare centers, and colleges in this district of the state. ] : सध्या राज्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढत आहे . यामुळे प्रशासनांकडून आवश्यक त्या ठिकाणी सोयी – सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत .
सध्या राज्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र , कोकण मध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे . तर विदर्भांमध्ये पावसाने रौद्र रुप धारण केले आहे . यामुळे जिल्हा प्रशासनांकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
या दोन जिल्ह्यांतील शाळा / महाविद्यालये बंद : आज दिनांक 25 जुलै रोजी हवामान खात्यांकडून गडचिरोली , भंडारा , चंद्रपुर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . या जिल्ह्यांत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांतील शाळा , अंगणवाड्या , महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग शिकवण्यांना आज दिनांक 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . याबाबत चंद्रपुर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नितीन व्यवहारे व भंडारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी आदेश जारी करण्यात आले आहेत .
अतिपर्जन्यमानामुळे जन-जीवनांवर विपरीत परिणाम होवू नये , याकरीता सदर निर्णय घेण्यात आलेला आहे . तर तातडीच्या बाबी म्हणून NDRF पथके तैनात करण्यात आले आहेत .
- राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट! आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींकडे सर्वांचे लक्ष; वेतन आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार?
- महाराष्ट्र शासनाचे 4 महत्त्वाचे शासन निर्णय! राज्य कर्मचारी, बेरोजगार तरुण आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या बातम्या
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची मोठी भेट! सण अग्रिमाच्या रकमेत वाढ; 20 हजार रुपये मिळणार
- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिक्षण संचालनालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; शाळांना दिले तातडीचे निर्देश
- आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! HRA आणि TA भत्त्यात वाढीची मागणी; लेव्हल-1 कर्मचाऱ्यांना 9 हजार रुपये मिळणार?