ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; मंत्र्याकडून महत्वपुर्ण निर्देश !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Big update regarding August paid in September salary ] : ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहेत . मा.मंत्र्यांकडून याबाबत महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत .

केंद्र सरकार मार्फत सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे . सदर प्रणालीच्या आधारेच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन अदा केले जाणार आहेत .

राज्याचे मा.महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे , कि ज्या कर्मचाऱ्यांनी माहे ऑगस्ट महिन्यांमध्ये पुर्ण उपस्थिती आधार बेस जिओ – फेसिंग ॲपच्या माध्यमातुन पुर्ण केली आहे . अशाच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्यांचे वेतन अदा करण्यात येणार आहेत .

याबाबत महसुल मंत्री बावनकुळे यांनी 150 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत निर्णय घेण्यात आला आहे . कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे कार्यालयांमधून घेण्यात येणार असल्याने , कर्मचाऱ्यांना नियमित आधार बेस ॲप द्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे .

हे पण वाचा : 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 4,987 रिक्त जागेवर नविन महाभरती ;

तांत्रिक अडचणी : आधार बेस प्रणाली काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे उपस्थिती नोंदवता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून येत आहेत . सदर तांत्रिक अडचणीचे निकारण करणे आवश्यक आहे . अथवा त्याकरीता विशेष सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे .

Leave a Comment