Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Relief fund announced for damage to agricultural crops due to unseasonal rains and hailstorms in the state between February 2025 and May 2025. ] : राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी देणेबाबत महसूल व वन विभाग मार्फत दिनांक 22.07.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या काळात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता एकुण 3,37,41,53,000/- रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे .
सदर निधी हा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातुन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . सदरचा निधी हा शेतीपिक नुकसानीचा खर्च मागणी , या मुख्य लेखाशिर्षाखाली खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर निर्णयांमध्ये जिल्हानिहाय प्रस्तावाचा दिनांक कालावधी बाधित क्षेत्र हेक्टर , बाधित शेतकरी संख्या व निधी रक्कम नमुद करण्यात आलेले आहेत . याबाबत सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .
- शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे संदर्भातील सुधारित अटी व शर्ती या संदर्भातील महत्त्वपूर्ण GR !
- रिकाम्या जागेत मोबाईल टॉवर बसवून दरमहा कमवा 50 ते 70 हजार रुपये! पहा संपूर्ण प्रक्रिया !
- काय सांगता? फक्त एकदाच गुंतवणूक करा, मिळेल 58 हजार रुपये पेन्शन; पहा LIC ची भन्नाट योजना !
- पावसाच्या रेड अलर्टमुळे राज्यातील या जिल्ह्यातील शाळा , अंगवाडी , महाविद्यालयांस सुट्टी जाहीर !
- ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; मंत्र्याकडून महत्वपुर्ण निर्देश !