Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Number of vacant posts in the state reaches 3 lakh; Increasing retirement age of employees positive.. ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अधिकारी / कर्मचारी रिक्त पदाचा आकडा दिवसेंदिवस चाढतच चालला आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढीला पोषक स्थिती निर्माण होत आहे .
प्राप्त माहितीनुसार राज्य शासन सेवेतुन दरवर्षी कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी 3 टक्के कर्मचारी निवृत्त होत आहेत . तर त्या प्रमाणात पदभरती होत नसल्याने रिक्त पदे व पदभरती यांमध्ये मोठी तफावत आढळून येत आहेत .
परिणामी सरकारला बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठा करुन घ्यावा लागत आहे . यामुळे बऱ्याच विभागांमध्ये कायम कर्मचाऱ्यांपेक्षा बाह्ययंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे . . रोजंदारी / बाह्ययंत्रणेवरील कर्मचाऱ्यांवर अधिक जोखीमीची जबाबदारी देवू शकत नाही . परिणामी जबाबदार कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे .
राज्य शासनांचा कार्यरत पदापैकी सध्यस्थिती : सध्या राज्यात 7.19 लाख पदे मंजूर आहेत , तर यापैकी 2,92,570 पदे रिक्त आहेत . तर यांमध्ये माहे डिसेंबर पर्यंत तब्बल 5289 कर्मचाऱ्यांची भर पडणार असल्याने , रिक्त पदाचा आकडा हा 3 लाखांवर पोहोचणार आहे .
हे पण वाचा : “या” प्रमुख 09 मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी ;
निवृत्तीचे वय वाढीस पोषक स्थिती : राज्य शासन सेवेतील वर्ग 3 , 2 व 1 अधिकारी / कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे . सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढीची बऱ्याच दिवसांपासुनच्या मागणी रिक्त पदाचा आकडा वाढल्याने पोषक स्थिती निर्माण झालेली आहे .
यामुळे वरील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वयात 02 वर्षे वाढ केल्यास 58 वर्षे वरुन निवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके होईल .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025