Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government employees instructed to strictly implement these rules as per the new circular ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन परिपत्रकानुसार काही नियमांचे कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , सदर नियम पुढीलप्रमाणे पाहुयात .
कार्यालयात मोबाईलचा वापर : आजकाल सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे , यामुळे नागरिकांना सुविधा पुरवताना विलंब होण्याच्या तक्रारी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत . याचे मुख्य कारण म्हणजे कार्यालयांमध्ये मोबाईलचा वापर होणे .
वैयक्तिक समारंभ : सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक समारंभ जसे वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत . अशा प्रकारचे कृत्य करणे कारवाईस पात्र ठरणारे आहेत . यामुळे यापुढे असे वैयक्तिक समारंभ सरकारी कार्यालयांमध्ये केल्यास , कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
नागरिकांना कठोर वागणुक : काही कर्मचारी नागरिकांशी कठोर वागणुक देत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत , जसे कि नागरिकांशी उद्धट बोलणे , महिलांशी गैरवर्तन करणे , ज्येष्ठ नागरिकांना जदल सुविधा न देणे अशा प्रकारच्या कठोर वागणुक यापुढे केल्यास , सदर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे .
हे पण वाचा : सातवा वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता ( DA ) 4% ने वाढणार !
कार्यालयीन वेळाचे पालन : सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे सरकारी कार्यालयीन कामाचे वेळा तंतोतंत पालन करावे लागणार आहे . सकाळी कार्यालयीन वेळेत हजर होणे आवश्यक आहे , तसेच सायंकाळी कार्यालयीन वेळा संपेपर्यंत कार्यालय हजर रहावे लागणार आहे .
नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कारवाई : सरकारी कर्मचाऱ्यांकडून वारंवार सदर नियमांचे उल्लंधन होत असल्यास , सदर कर्मचाऱ्यांस प्रथमत : समज दिली जाईल , त्यांनतरही चुका होत असल्यास पदोन्नती थांबवणे , वेतनवाढी रोखणे , किरकोळ प्रकारच्या शिक्षा तसेच नुकसान भरवाई वसुली करणे , सक्तीची निवृत्ती / बडतर्फ पर्यंची कारवाई करण्याचे निर्देश नागरी सेवा अधिनियम नुसार नमुद आहेत .