खुशखबर : या राज्य कर्मचाऱ्यांना आता पेन्शनसही ग्रॅज्युईटीची देण्याची मोठी घोषणा – अधिवेशात आली मोठी बातमी !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Now there is a big announcement about pension for these state employees – Minister’s information in the Legislative Council. ] : जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच वर्षांपासुन मागणी सुरु आहे . अशातच सध्या राज्यातील खाली नमुद कर्मचाऱ्यांना पेन्शनची तरतुद करण्यात आलेली आहे .

राज्याचे पावसाठी अधिवेशन सुरु असून , या अधिवेशनांमध्ये विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यात येत असून , बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत . अधिवेशनांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच इतर प्रलंबित प्रश्नांसाठी विविध आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता .

यावर उत्तर देत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले कि , अंगणवाडी सेविका / मदतनिसांच्या मानधन करीता निधीची तरतुद करण्यात आलेली आहे , व लवकरच मानधन अदा करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे .

पेन्शन व ग्रॅच्युईटी तरतुद : अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांना पेन्शन व ग्रॅच्युईटीची तरतुद करणेबाबत प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , पुढील कार्यवाही करीता प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे .

सदर प्रस्तावाच्या मंजुरीनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅच्युईटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे .

Leave a Comment