Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Big update regarding July salary of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्यांच्या वेतन बाबत मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . कर्मचाऱ्यांना या महीन्यांन आपल्या उपस्थिती संदर्भात नोंदविणेबाबत सुचित करण्यात आलेले आहेत .
Aadaar BAS प्रणाली : देशातील सर्वच सरकारी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांसाठी हजेरी नोंदविण्यासाठी आधार बेस प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे . सदर आधार बेस प्रणालीच्या माध्यमातुन सकाळी इन व सायंकाळी सुट्टीच्या वेळी आऊट करणे आवश्यक आहे .
उपस्थिती न नोंदविण्याऱ्यांचे वेतन नाही : राज्य सरकारच्या काही विभागामार्फत चक्क परिपत्रक काढून आधार बेस प्रणालीच्या माध्यमातुन उपस्थिती न नोंदविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्यांचे वेतन रोखण्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
दिनांक 01 जुलै पासुन कर्मचाऱ्यांना सदर आधार बेस प्रणालीच्या माध्यमातुन उपस्थिती नोंदवावी लागेल , अन्यथा जुलै महिन्यांचे वेतन रोखण्यात येणार आहेत . जुलै महिन्यांच्या वेतनासोबत आधार बेस प्रणालीची उपस्थिती देखिल सादर करावी लागणार आहे .
आधार बेस प्रणाली उपस्थितीसाठी योग्य आहे का ? : आधार बेस प्रणालीच्या माध्यमातुन उपस्थिती नोंदविणे योग्य आहे , परंतु आजही राज्याही बऱ्याच भागांमध्ये नेटवर्क चांगले नाही , अशा भागातुन उपस्थिती नोंदविणे अनेक तांत्रिक अडचणी येतात . शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर खालील Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.