Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ The final dearness allowance (DA) of the Seventh Pay Commission for government employees/pensioners will be increased by 4% ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना सातवा वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता 4 टक्केने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
जुलैपासुन डी.ए वाढ : केंद्र सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दिनांक 01.01.2025 पासुन 2 टक्के म्हणजेच एकुण 55 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात आलेली होती . आता परत एकदा माहे जुलै मध्ये डी.ए वाढ होत असते , सदर डी.ए वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या ( AICPI ) आधारावर वाढविण्यात येते .
जुलै महिन्याची महागाई भत्ता वाढ ही जानेवारी ते जुन महिन्यांची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेतला जातो , तर याउलट जानेवारी मधील डी.ए वाढ लागु करण्यासाठी जुलै ते डिसेंबर महिन्याचा निर्देशांक विचारात घेण्यात येतो .महिना निहाय निर्देशांक पुढीलप्रमाणे पाहूयात ..
अ.क्र | महीना | AICPI निर्देशांक |
01. | जानेवारी 2025 | 143.7 |
02. | फेब्रुवारी 2025 | 142.8 |
03. | मार्च 2025 | 143 |
04. | एप्रिल 2025 | 143.5 |
05. | मे 2025 | 144 |
06. | जुन 2025 | – |
वरील तक्तानुसार माहे जुन महिन्यांचे निर्देशांक अद्याप बाकी आहे , जुन महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्यानंतर डी.ए वाढीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल .
तज्ञांच्या मते माहे जानेवारी ते मे 2025 पर्यंतच्या कालावधीच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार करता सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये 3.50 टक्के पर्यंत वाढ होवू शकेल , व जुन महिन्यांच्या निर्देशांकाच्या भाकित करुन एकुण 4 टक्के डी.ए वाढ होवू शकेल , असा अंदाज आहे . शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर खालील Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.