आंतरजिल्हा बदली बाबत ग्राम विकास विभाग मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.03.07.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important circular issued by Rural Development Department regarding inter-district transfer dated 03.07.2025 ] : राज्यातील शिक्षक संवर्गातील आंतरजिल्हा बदली बाबत ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 03.07.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित केला आहे .

सदर शासन परिपत्रक हे  मा.उच्च न्यायालय , नागपूर येथे दाखल रिट याचिका नुसार आंतरजिल्हा बदली बाबत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषदा सर्व ) यांच्याप्रती सादर करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद आहे कि , दि.21.06.2023 रोजीच्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये विनंती बदली ज्यांना मिळाली नाही , अशा शिक्षकांना जसे पदे रिक्त होतील , त्या प्रमाणात त्यांना त्या जागी नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर आंतरजिल्हा संपर्णत : बद करण्याची तरतुद सदर बदली धोरणांमध्ये करण्याचे बाब नमुद केली होती . तसेच प्रतिक्षाधीन असणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखिल बदली करण्यात यावी , अशी बाब नमुद आहे .

तर सन 2025 करीता जिल्हा प्रशासनातील शिक्षकांच्या बदल्या ह्या पवित्र पोर्टलवरील नविन शिक्षकांच्या पदभरतीच्या पार्श्वभूमीवर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबात आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून , त्यानुसार बदली प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment