राज्य कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेत / कार्यालयात “या”वैयक्तिक बाबी केल्यास , होणार कडक कारवाई !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ If state employees do these personal matters during government hours/in the office, strict action will be taken. ] : सरकारी वेळात कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक समारंभ अथवा वैयक्तिक बाबीसाठी वेळा दिल्यास , अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश ..

सध्या काही सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक गोष्टी साजरा करत असल्याचे सोशल मिडियावर व्हिडीओज , फोटो व्हायरल होत आहेत . कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक बाबी सरकारी कार्यालये / सरकारी वेळांमध्ये साजरा करणे ही बाब चुकीची असुन , अशा घटना यापुढे घडल्यास कारवाईचे निर्देश सामान्‍य प्रशासन विभागाच्या ..

महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 मधील नमुद कायद्यानुसार कारवाईच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . जमाबंदी आयुक्त कार्यालयांमध्ये सोशल मिडीयावर सरकारी वेळांमध्ये वाढदिवस साजरा करताना केक कापून , स्नॅक्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे .

यावर सामान्य प्रशासन विभागांकडून सर्वच विभागांना परिपत्रक सादर करुन कर्मचाऱ्यांचे असे वैयक्तिक समारंभ केल्यास कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत .यांमध्ये एकत्रिक येवून चहापानाचा कार्यक्रमावर देखिल चाप देण्यात आला आहे .

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी यापुढे अशा प्रकारच्या कृत्यावर संयम ठेवावा ,अन्यथा आपल्यावर कारवाई होवू शकते .

Leave a Comment