Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR issued regarding retired employees ] : निवृतत कर्मचाऱ्यांच्या बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.14.08.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 मधील नियम 68 च्या धर्तीवर वित्त विभागाने दि.03.06.2026 च्या शासन निर्णयानुसार निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी विहीत मुदतीत शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत सुचना निर्गमित केलेल्या आहेत .
जे कर्मचारी सक्तीने सेवानिवृत्त अथवा बडतर्फ झाले आहेत त्यांच्याबाबतही सदर निर्णयातील तरतुदी लागु असणार आहेत . तसेच निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे पाल्य शालेय शिक्षण घेत असले व त्याचे शैक्षणिक वर्ष जुनमध्ये संपत असेल तर त्यास त्यापुष्ट्यर्थ आवश्यक ती कागदपत्रांच्या अधीन राहुन , शासकीय निवासस्थानांमध्ये विद्यमान अनुज्ञप्ती शुल्काच्या 5 पट इतक्या दराने निर्णयांमध्ये नमुद अटीनुसार वास्तव्याची मुभा देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे .
कर्मचारी माहे जानेवारी ते जुन महिन्यात सेवानिवृत्त होत असेल तर त्यास त्या वर्षाच्या जुन अखेरपर्यंत माहे शासकीय निवासस्थानात वास्तव्याची मुभा लागु असेल . तसेच एखादा कर्मचारी माहे जुलै ते डिसेंबर महिन्यात निवृत्त होत असेल व त्या वर्षात जर त्यांचे पाल्य शालेय शिक्षण घेत असल्यास त्या कर्मचाऱ्यांस पुढील कॅलेंडर वर्षाच्या जुन अखेर पर्यंत वास्तव्याची मुभा लागु असणार आहे .
उदा. एखादा कर्मचारी माहे जुलै ते डिसेंबर 2026 मध्ये निवृत्त होत असेल , तर त्यास दि.30.06.2027 पर्यंत वास्तव्याची मुभा असणार आहे . मात्र सदर कालावधी संपुष्टात आल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान त्वरित रिक्त करणे आवश्यक राहील , अन्यथा दि.03.06.2026 च्या शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .

- सातवा वेतन आयोग अंतर्गत 03 लाभांचे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती याजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत GR निर्गमित दि.14.08.2026
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.08.2026
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत ..
- या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत GR निर्गमित दि.10.08.2026
- कुटुंब निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान , रुग्णता सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती बाबत GR दि.12.08.2026