वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) regarding the constitution of a committee for the review of service and consideration of representations upon attaining the age of 50/55 years or completing 30 years of qualifying service. ] : वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.14.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मा.राज्यपालांचे सचिव कार्यालय व मा.राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालय या कार्यालयातील अधिकारी ( गट अ राजपत्रित व गट ब राजपत्रित ) यांचे वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन करण्यासाठी…

 पुनर्विलोकन समिती व सेवापुनर्विलोकनानंतर मुदतपुर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करण्याकरीता अभिवेदन समिती खाली नमुद केल्याप्रमाणे गठीत करण्यात येत आहे .

सदर समिती पात्र होणाऱ्या अधिकाऱ्यांची वयाची 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्यासाठी दि.10.06.2019 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांप्रमाणे छाननी करुन पुनर्विलोकनाची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

यांमध्ये 50 वर्षे पुर्ण होतेवेळे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण होतेवेळी यापैकी जे प्रथम घडेल तेव्हा एकदाच पुनर्विलोकन करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment