Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Decision regarding pensions issued on 14.07.2026. ] : निवृत्तीवेतन संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.14.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे , ही बाब शासनाच्या विचाराधीन होती , त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञा पत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेल्या दि.19.06.2013 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे .
यानुसार निवृत्तीवेतन करीता बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या पेपरवर शपथपत्र भरुन अधिदान व लेखा कार्यालय , मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमध्ये सादर करण्यास दि.01.08.2026 पासुन मान्यता देण्यात येत आहे .

- निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना किती रक्कम मिळते? जाणून घ्या प्रमुख लाभांची माहिती
- सेवानिवृत्ती उपदानाबाबत मोठा निर्णय; NPS कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वांत मोठी अपडेट; NPS आणि निवृत्तीविषयक निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष
- राज्यातील ‘या’ पेन्शनधारकांसाठी DA 63% लागू; दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजी पत्रक निर्गमित
- राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे 63% DA कधी मिळणार? निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष