Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 10.07.2026 regarding the option for the accumulated amount in Tier-01 for state employees under the National Pension System. ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना स्तर -01 मध्ये जमा रक्कम विकल्पाबाबत वित्त विभाग मार्फत दि.10.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी अंतर्गत कन्झरव्हेटीव्ह लाईफ सायकल निधी व मॉडरेट लाईफ सायकल निधी या पर्यायाचे नावात ….
अनुक्रमे Life cycle 25-low व life cycle 50 Moderate असा बदल करण्यात आलेला आहे .तसेच ऑटो चॉईस सायकल निधी अंतर्गत अतिरिक्त विकल्प उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु असणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रान खात्यात स्तर 01 मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणूकीकरीता दि.30.09.2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार , उपलब्ध करुन दिलेल्या विकल्पासह निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी उपलब्ध करुन दिलेले वरील अतिरिक्त विकल्प निवडण्याची मुभा देण्यात येत आहे .


- राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना स्तर -01 मध्ये जमा रक्कम विकल्पाबाबत ..GR निर्गमित दि.10.07.2026
- निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबियांना रोकड विरहित वैद्यकीय सुविधा योजना लागु करणेबाबत GR निर्गमित दि.10.07.2026
- शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 07 पोलिस आमदार मतदार संघ निर्माण करण्याबाबतची शिफारस व पाठिंबा …
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.07.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम , 2026-27 करीता राज्यात राबविणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026