Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Recommendation and support for creating seven police MLA constituencies for police personnel, modeled on the Teachers’ Constituencies… ] : महाराष्ट्र राज्यात शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर पोलिस आमदार मतदार संघ निर्माण करण्याबाबत शिफारस व पाठिंबा देत असलेबाबत रोहित सुमन आर.आर.आबा पाटील यांनी मा.अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रति पत्र सादर केले आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्यातील पोलिस विभागात कार्यरत राहुन राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुष्यभर निष्ठेने सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या धर्तीवर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधित्व मिळणे अत्यंत आवश्यक आहे .
शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या सेवाकाळात प्राप्त केलेला प्रशासकीय अनुभव , कायदा व सुव्यवस्थेचे ज्ञान , सामाजिक प्रश्नांची जाण तसेच अंतर्गत सुरक्षा विषयक अभ्यास यांचा शासनाच्या निर्णय प्रक्रियेत प्रभावी उपयोग होवू शकतो .
अशा अनुभवी व्यक्तींना विधानसभा अथवा विधान परिषदेत प्रतिनिधीत्व मिळाल्यास कायदा व सुव्यवस्था , अंतर्गत सुरक्षा , पोलिस कल्याण , युवक मार्गदर्शन , सामाजिक मार्गदर्शन , सामाजिक सलोखा व जनहिताच्या विविध विषयांवर शासनांस मोलाचे मार्गदर्शन लाभेल असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभागांच्या अनुषंगाने स्वतंत्र सेवानिवृत्त पोलिस मतदारसंघ निर्माण करुन सात प्रतिनिधी ( आमदार ) निवडून देण्याची व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी करण्यात येत असून , सदर संकल्पनेस मा.आमदार रोहित पोटिल यांच्या कडून पाठिंबा देण्यात येत आहे .

- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026
- HRA : घरभाडे भत्ता संदर्भात आनंदाची बातमी ; या 17 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ..
- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…