माहे जुन महिन्यांचे वेतन ( Salary ) अदा करणेबाबत , नियंत्रक अधिकाऱ्यांच्या नियत्रणाखाली निधीचे वितरण GR निर्गमित दि.03.07.2025

Spread the love

Marasanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Regarding the payment of salary for the months of June, GR issued for distribution of funds under the control of the controlling officers. ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे जुन 2025 चे वेतन देयके अदा  करणेकामी शा.शि.विभाग मार्फत दि.03.07.2025 रोजी GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , आर्थिक वर्ष 2025-26 करीत अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी हा वितरण करीता बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे .

सदर निधीचे वितरण करताना नियंत्रक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत . त्यांच्या अधिनस्त निधीचे वितरण व खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत . यांमध्ये लेखाशिर्ष , नियंत्रक अधिकारी व वितरीत करण्यात आलेला निधी तक्त्ता निहाय नमुद करण्यात आलेला आहे .

यांमध्ये पालिका शाळा / जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , प्राथमिक शाळा तपासणी , सर्वसाधारण शिक्षण , शिक्षक प्रशिक्षण , शाळा न्यायाधिकरणे , सचिवालय – सामाजिक सुरक्षा व कल्याण , वृद्ध , निराधारांचे कल्याण – अपंगाकरीता एकत्रिकृत शिक्षण अशा विविध लेखाशिर्षानिहाय निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत .

सदर निधी वितरण करीत असताना , ज्या लेखा शिर्षाकरीता प्रयोजन करण्यात आला आहे , त्याच लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत . या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे माहे जुन महिन्यांचे वेतन हे वेळेवर अदा होणार आहे .

Leave a Comment