Narathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 8th pay commission various demand from employee sanghatana ] : आठव्या वेतन आयोग सोबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची दिनांक 04 मे 2026 रोजी यशस्वी बैठक संपन्न झाली आहे . या बैठकीमध्ये संघटनेकडून काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत . प्रमुख मागण्या खालील प्रमाणे पाहूयात .
01. फॅमिली युनिट : किमान वेतन त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टर निश्चित करीत असताना , फॅमिली युनिटमध्ये आई-वडील यांचा समावेश करून एकूण पाच जणांची फॅमिली युनिट गृहीत धरावेत असा मुद्दा संघटनेकडून मांडला आहे .
02. किमान वेतन : सद्यस्थितीत असणारे किमान 18,000/- रुपये वेतन वरून 65,000/- रुपये इतके किमान वेतन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे .
03. फिटमेंट फॅक्टर : सातवा वेतन आयोगामध्ये 2.57 पट इतका फिटमेंट फॅक्टर होता , तर आठवा वेतन आयोगामध्ये 3.8 इतका फिटनेस फॅक्टर मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे .
04. महागाई भत्ता मधील वाढ निर्धारण : सद्यस्थितीमध्ये महागाई भत्ता वाढीचा दर अल्प असल्याने , कर्मचाऱ्यांना हवा तसा आर्थिक लाभ मिळत नाही . यामुळे बाय डिफॉल्ट 04 टक्के किमान महागाई भत्ता वाढ निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे .
05. प्रवास भत्ता : प्रवास भत्ता मध्ये यापूर्वी प्रमाणे म्हणजेच सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
06. आश्वासित प्रगती योजना : सातवा वेतन आयोगामध्ये शिक्षक सोडून इतर कर्मचाऱ्यांना 10 , 20 व 30 वर्षानंतर आश्वासित प्रगती योजना म्हणजेच पुढील वेतनश्रेणी लागू होते. परंतु शिक्षकांनाच 12, 24 , 36 हे चटोपाध्याय वेतनश्रेणी निवड श्रेणी योजना लागू आहे . यामुळे अशा प्रकारचे भेदभाव न करता सरसकट शिक्षकांना देखील आश्वासित प्रगती योजना लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
07. वार्षिक वेतन वाढ : वार्षिक वेतन वाढ तीन टक्के वरून पाच टक्के करण्याची मागणी यावेळी करण्यात आली .
- महागाई भत्ता 60% दराने लागू करणे बाबत शासन निर्णय निर्गमित दि.05.05.2026
- मोठा शासन निर्णय ; राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा !
- आठव्या वेतन आयोगासोबत राज्य कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न ; या प्रमुख मागण्यांची घेणार दखल !
- 5 राज्याचा अंतिम विधानसभा निकाल ; सविस्तर निकाल .
- माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR ; दि.30.04.2026