Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Minutes of the meeting held on various issues regarding the adjustment of additional teachers ] : दि.15.03.2024 मधील संचमान्यतानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन संदर्भात झालेल्या बैठकीचे इतिवृत्त परिपत्रक शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत जाहीर करण्यात आला आहे .
यांमध्ये प्राथमिक गटावरील इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतर रिक्त परदांवर अतिरिक्त ठरलेल्या पदवधीर शिक्षकांचे समायोजन करणे या विषयावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता 1 ली ते 5 वीच्या गटामधील रिक्त पदांवर त्याच जिल्ह्यातील अतिरिक्त् ..
ठरलेल्या इयत्ता 6 वी ते 8 वी गटातील शिक्षकाचे शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील तरतुदीनुसार समायोजन करण्यात यावेत व अशा प्रकारची कार्यवाही करताना सदर शिक्षकांचे मुळ पदावरील वेतनास संरक्षण राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच मराठी / उर्दु शिक्षकांची त्यांच्या माध्यम नसलेल्या शाळांमध्ये नेमणूक झालेली असल्यास त्याबाबत करावयाची कार्यवाही या विषयावर असे निर्देश देण्यात आले कि , मराठी / उर्दू शिक्षकांचे त्यांच्या शैक्षणिक अर्हतानुसार त्यांच्याशी संबंधित माध्यम असलेल्या शाळांमधील ..
पदांवर शासन निर्णय दिनांक 15.03.2024 मधील तरतुदींनुसार समायोजन करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच इ.9-10 वीच्या पटसंख्येमध्ये सवलत देणेबाबतच्या विषयावर असे निर्देश देण्यात आले कि , ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9-10 वी करीता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 0 ते 03 किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी ..
माध्यमिक शाळा असल्यास शासन निर्णय दिनांक 15.03.2024 मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .तसेच शासन निर्णय दिनांक 15.03.2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9 – 10 वी करीता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासुन 3-5 किलोमीटर परिसरात असणाऱ्या व त्या परिसरात माध्यमिक शाळांत इ.9 वी ते 10 वीच्या गटाकरीता 0 पदे मंजुर होणाऱ्या शाळांमध्ये इ.9 – 10 वी च्या गटामध्ये संचमान्यता वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 40 असल्यास 03 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावेत .
या संदर्भातील सविस्तर बैठकीचे इतिवृत्त डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा