Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 04 government decisions issued regarding state employees on 18.03.2026. ] : दिनांक 18 मार्च 2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.पदोन्नतीने सुधारित पदस्थापना : सहाय्यक अधिक्षक / मुख्य लिपिक / कनिष्ठ लेखापरिक्षक / लेखापाल ( गट क ) या संवर्गातुन अधिक्षक व तत्सम , सामान्य राज्य सेवा गट ब ( प्रशासन शाखा ) या संवर्गात पदोन्नतीने सुधारित पदस्थापना देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभाग : येरवाडा कारागृह मुद्रणालय पुणे व मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय , नागपुर येथील लिपिकवर्ग कर्मचाऱ्यांना इतर मुद्रणालयातील लिपिकवर्ग कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कराव्या लागणाऱ्या कामाचा जादा एक तास कमी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : शिधावाटप अधिकारी / मुख्य निरीक्षण अधिकारी गट – ब ( राजपत्रित ) या संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची दिनांक 01.01.2026 रोजीची स्थिती दर्शविणारी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे .
04.कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग : राज्यातील अशासकीय अनुदानित व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी वरील व्याज प्रदानांची रुपये 54,60.55 लाख रुपये इतकी रक्कम पुस्तकी समायोजित करण्यास परवानगी दिली आहे .
या संदर्भातील वरील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !
- दि.18.03.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 शासन निर्णय निर्गमित !
- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर मार्च महिना अखेर आर्थिक बाबी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत सुचना : GR निर्गमित दि.13.03.2026
- CMO : राज्यामध्ये दि.17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची शक्यता -भारतीय हवामान खात्याचा अंदाज ..