Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Distribution of funds for salaries and allowances of employees as well as pensions and allowances ] : जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारितील यांत्रिकी उपविभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद स्तरावर निर्मित पदावर हातपंप / विजपंप देखभाल दुरुस्ती करीता कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच निवृत्तीवेतन व भत्ते करीता निधी वितरण करणेबाबत दि.10.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार भुजल व विकास यंत्रणाा पुणे यांच्याकडून प्राप्त माहीतीनुसार 32 जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट 2024 ते माहे फेब्रुवारी 2025 या सात महिन्यांकरीता वेतन व सेवानिवृत्ती वेतन देण्याच्या अनुषंगाने , कर्मचाऱ्यांची सुधारित आकडेवारी प्राप्त झाली आहे .
व प्राप्त आकडेवारीनुसार कार्यरत कर्मचारी संख्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या व एकुण कर्मचारी संख्या नुसार वेतन व सहायक अनुदाने वितरीत करण्यात येत आहेत .
जिल्हा परिषद निहाय कर्मचारी संख्या तसेच माहे ऑगस्ट 2024 ते माहे फेब्रुवारी 2025 करीता वितरीत अनुदाने तक्ता सदर निर्णयांमध्ये दर्शविण्यात आलेला आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026