Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [Women state officers/employees are allowed to leave the office early if they arrive at the office early. ] : राज्य अधिकारी / कर्मचारी कार्यालयात लवकर आल्यास अशा महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांस लवकर कार्यालय सोडण्याची मुभा देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.10.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, मुंबई महानगर क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला शासकीय अधिकारी / कर्मचारी सकाळी 9.15 वाजेपासुन सकाळी 9.45 पर्यंत जेवळी मिनिटे कार्यालयात लवकर येवून कामकाज करतील अशा महिलांना तेवढीच मिनिटे सायंकाळी कार्यालय लवकर सोडण्याची ( जास्तीत जास्त अर्ध्या तासाची ) सवलत देण्यात येत आहे .
यानुसार सरकारी कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता संबंधित सरकारी महिला अधिकारी / कर्मचारी यांनी घेणे अनिवार्य असणार आहे .
तसेच कामकाजाचे महत्व विचारात घेवून सरकारी महिला अधिकारी / कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेनंतर थांबणे बंधनकारक राहणार आहेत . ( यांमध्ये विधानमंडळ कामकाज , न्यायालयीन प्रकरणे इ. )
तसेच कार्यालयीन कामकाजाची तातडी विचारात घेता वरिष्ठ अधिकारी / कार्यालय प्रमुख यांनी विशिष्ट दिवशीच्या कामकाजाबाबत विर्निष्टपणे सुचना दिल्यास त्या सुचना संबंधित महिला अधिकारी / कर्मचारी यांना बंधनकारक राहणार आहे .

- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात सुधारित परिपत्रक निर्गिमित दि.27.04.2026
- जनगणना 2027 करीता घरयादी व घरगणना सुचना माहिती पुस्तिका मराठी माध्यम PDF !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.28.04.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जनगणना करीता प्रगणकाद्वारे विचारले जाणार हे 34 प्रश्न ; जाणून घ्या सविस्तर प्रश्नांची यादी !
- माहे मार्च / एप्रिल 2026 च्या वेतन संदर्भात महत्वपुर्ण अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.23.04.2026