Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ These 3 types of deductions will be made from the February salary of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातुन दरवर्षी खाली नमुद 03 प्रकारच्या कपाती केल्या जातात , नेमक्या कोणत्या कपाती आहेत ? ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
01.राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपाती : दरवर्षी राज्य सरकारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातून वार्षिक वर्गणी कपात केली जाते . सदर योजना अंतर्गत दिनांक 24.01.2023 रोजीच्या निर्णयानुसार सुधारित वार्षकि वर्गणी सुधारित करण्यात आलेली आहे . संवर्ग निहाय वार्षिक वर्गणी भिन्न आहे .
| संवर्ग | विमा रक्कम | वार्षिक वर्गणी (रुपये मध्ये GST सह) |
| गट अ | 25 लाख रुपये | 750+135=885/- |
| गट ब | 20 लाख रुपये | 600+108=708/- |
| गट क व ड | 15 लाख रुपये | 450+81=531/- |
02.व्यवसाय कर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महीन्यांच्या वेतनातुन व्यवसाय करची कपात ही 200/- रुपये असते , परंतु दरवर्षी माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातून व्यवसाय करची 300/- रुपये रक्कम कपात होते .
03.आयकर रक्कम : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी महिन्यांचे वेतन अदा करताना , आयकरचे विवरण सादर करणे आवश्यक असते . व आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये उर्वरित आयकर रक्कमेचा भरणा करावा लागेल . अन्यथा फेब्रुवारी महिन्यांचा पगार होत नाही .
- बदली संदर्भात शासन अध्यादेश दि.27.05.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.27 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आले 05 मोठे शासन निर्णय ..
- जिल्हा परिषद , अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबत महत्वपुर्ण GR
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.25.05.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- जनगणना नियुक्त कर्मचाऱ्यांच्या ( प्रगणक , पर्यवेक्षक ) यांना संरक्षण देणेबाबत निवेदन .