@marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ The minimum pension will increase by a whopping 5 times… ] : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे किमान पेन्शन मध्ये चक्क 5 पटीची वाढ होणार आहे . याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन ( EPFO ) मार्फत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे .
प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मार्फत किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे . सध्या स्थितीत किमान पेन्शन 1000/- रुपये इतकी आहे . तर यांमध्ये आणखीण 5 पटीची वाढ करण्याचा विचार ईपीएफओ मार्फत केला जात आहे .
जर 5 पटीने वाढ केल्यास , किमान पेन्शन ही 1000/- रुपये वरुन 5,000/- रुपये इतकी होणार आहे . खासगी क्षेत्रांमध्ये कार्यरत पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिलासा मिळावा याकीरता ईपीएफओ मार्फत नविन वर्षांमध्ये किमान पेन्शन वाढीचा निर्णय घेतला जात आहे .
निवृत्तीनंतर सध्य स्थिती केवळ 1000/- रुपये इतकी तुटपंजी किमान पेन्शन मिळते , यांमध्ये 5 पट वाढ केल्याने किमान पेन्शनची रक्कम ही 5000/- रुपये इतकी होणार असल्याने , पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे .
कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा ; सदर किमान पेन्शनची वाढ ही ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या खासगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे . तर सदर किमान पेन्शनचा लाभ प्राप्तीसाठी किमान 10 वर्षेांची सलग सेवा पुर्ण होणे आवश्यक आहे .
कधीपासुन होणार वाढ : ईपीएफओ मार्फत सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे , केंद्राच्या मंजूरीनंतर येत्या अर्थसंकल्पांमध्ये याबाबत विशेष आर्थिक तरतुद केली जाणार आहे .
- महागाई भत्ता 60% दराने लागू करणे बाबत शासन निर्णय निर्गमित दि.05.05.2026
- मोठा शासन निर्णय ; राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा !
- आठव्या वेतन आयोगासोबत राज्य कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न ; या प्रमुख मागण्यांची घेणार दखल !
- 5 राज्याचा अंतिम विधानसभा निकाल ; सविस्तर निकाल .
- माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR ; दि.30.04.2026