दि.09.04.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 05 महत्वपुर्ण GR

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 05 Important Government Resolutions (GRs) issued on April 9, 2026, regarding State Officers and Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.09.04.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय .

01.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : सहाय्यक अधिक्षक / मुख्य लिपिक / कनिष्ठ लेखापरिक्षक / लेखापाल ( गट क ) या संवर्गातुन अधिक्षक व तत्सम , सामान्य राज्य सेवा गट ब ( प्रशासन शाखा ) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत शासन शुद्धीपत्रक काढण्यात आला आहे .

02.महसुल व वन विभाग : नोंदणी व मुद्रांक विभागतील पदांचा सुधारित आकृतीबंध – पुरकपत्र महसुल व वन विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .

03.नियोजन विभाग : नियोजन विभागाच्या मानव विकास कार्यक्रम अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या 94 अस्थायी पदांना दि.01.04.2026 ते दि.30.04.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

04.विधी व न्याय विभाग : महाप्रशासक व शासकीय विश्वस्त , महाराष्ट्र राज्य मुंबई या कार्यालयाच्या आस्थापनेवरील महाप्रशासक व शासकीय विश्वस्त गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2022 , दि.01.01.2023 , दि.01.01.2024 , दि.01.01.2025 व दि.01.01.2026 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध् करण्यात आली आहे .

05.अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व निरीक्षण अधिकारी / परिमंडळ अधिकारी , गट ब ( राजपत्रित ) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत दि.09.04.2026 रोजी निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

या संदर्भातील वरील पाचही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी Click here

Leave a Comment