Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Two highly significant Government Resolutions issued on August 31, 2026, regarding state officers/employees… ] : राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 02 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ऑगस्ट महिना अखेर निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.वित्त विभाग : वित्त विभाग मार्फत अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार खालील प्रमाणे बाबी नमुद करण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असणाऱ्या अस्थायी पदांना तसेच यापुर्वी आढावा मंजुर केल्याच्या नंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही ..
अशा अस्तित्वात असणाऱ्या सर्व अस्थायी पदांना दि.01.09.2026 ते दि.28.02.2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत . तसेच सदर कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेवून सुधारित आकृतीबंधास …
उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक असेल . यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरीता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही , याची सर्व विभागांनी नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या आस्थापनेवरील पदांचा तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा आढावा घेवून सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव तातडीने वित्त विभागास सादर करण्याचे नियोजन करुन कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात ओलेले आहेत .
तसेच मुदतवाढ देण्यात येणाऱ्या पदांचा विभाग निहाय एकत्रित तपशिल अमुस ( वित्त ) यांना दि.15 सप्टेंबर 2026 पुर्वी उपलब्ध करुन द्यावयाचा आहे . तसेच यास्तव प्रत्येक विभागांने त्यांच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याच्या शासन निर्णयाची प्रत ही वित्त विभागास दि.10.09.2026 पुर्वी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

02. दुसरा महत्वपुर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी Click Here
- 📰 महाराष्ट्रातील आजच्या काही प्रमुख बातम्या … दि.01.09.2026
- भाषा सुट संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.31.08.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.31.08.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 02 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र नमुन्यात सुधारणा करणेबाबतचा GR ( वित्त विभाग )
- पेन्शन संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्वाळा ; पेन्शन पुनर्रचनाचे आदेश ..