राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आत्ताच्या काही चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Some current developments regarding state employees ] : राज्यातील अधिकारी / कर्मचारी संदर्भात आत्ताच्या मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संप / आंदोलने राज्यात विविध संघटनांच्या माध्यमातुन सुरु आहेत .

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप : राज्यातील अंगवाडी कर्मचाऱ्यांचा विविध मागणींसाठी दि.09.07.2025 रोजी संप आयोजित करण्यात आला होता , या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे , अंगणवाडीच्या वेळा 9.30 ते 04.00 ऐवजी 7.30 ते दुपारी 02.00 अशी करणे , उन्हाळी सुट्टी एक महिन्यांची करणे , मुख्य सेविका पदासाठी पदोन्नती निकष 10 वी उत्तीर्ण , व 55 वर्षे वयोमर्यादा ही अट पुर्वीप्रमाणे कायम ठेवणे .

आधार वाटप करताना सुरु असणारी आधार जोडणी रद्द करण्यात यावी , सरकारी कर्मचाऱ्यांचा देण्यात यावा . मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनाकरीता कामकाज केलेल्या अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांना सदर कामाचा मोबदला ( मानधन ) अदा करणे , अशा प्रकारच्या विविध मागणीकरीता अंगणवाडी सेविका / मतदनिस कर्मचाऱ्यांकडून संप आयोजित करण्यात आलेला आहे .  

11 कामगार संघटनाच्या संपास सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी संघटना समन्वय समितीचा पाठिंबा : देशात होत असणारे खाजगीकरण व नोकर कपात धोरण तसेच कर्मचारी विरोधात सुरु असणारे नविन धोरणास विरोध करण्यासाठी 11 कामगार संघटनांना देशपातळीवर एकदिवसीय संप आयोजित करण्यात आलेला होता .

सदर एक दिवसीय कर्मचारी संपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालिका प्रशासनांच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून पाठिंबा देण्यात आला .

आ.वि.विभाग नाशिक अंतर्गत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन :महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रमशाळा / वसतिगृहांमध्ये मागील 02-10 वर्षापर्यंत काम करणाऱ्या वर्ग 3 व वर्ग 04 कर्मचारी ( शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी ) यांना सरकारने डावलुन बाह्यस्त्रोत द्वारे आदेश देणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून , त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे .

 सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार बाह्यस्त्रोताद्वारे पदभरती रद्द करुन , जुन्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना रोजंदारी पद्धतीने आदेश देण्याची मागणी करण्यात येत आहे . यामुळे सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून दि.08.07.2025 पासुन नाशिक आयुक्तालय येथे ठिय्या आंदोलन करीत आहेत .

Leave a Comment