नविन वेतन आयोगा कामाच्या आधारावर मिळणार वेतनवाढ ; इतर वेतन आयोगापेक्षा आठवा वेतन आयोगात असतील अमुलाग्र बदल !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ New Pay Commission will give salary hike based on work; Know important update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 पासुन नविन वेतन आयोग लागु केला जाणार असून , यंदाचा आठवा वेतन आयोग इतर वेतन आयोगापेक्षा काहीसा वेगळा असू शकतो .

वेतन आयोग म्हणजे फक्त पगारवाढची बाब आठवते , परंतु यंदाच्या वेतन आयोगांमध्ये अमुलाग्र बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . आतापर्यंत कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यानंतर सात वेतन आयोग लागु करण्यात आले , यांमध्ये सहाव्या व सातवा वेतन आयोगात पगारवाढीचे प्रमाण अधिक आहे .

आठवा वेतन आयोगात पगारवाढ कामाच्या आधारावर : सोशल मिडीयावरुन प्राप्त माहितीनुसार , नविन वेतन आयोगांमध्ये , पगारवाढ ही कर्मचाऱ्यांच्या कामाच्या आधारावर दिली जाईल . कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरुप , त्यांने वर्षांमध्ये केलेले एकंदरित काम ,वर्षांमध्ये केलेले उत्कृष्ट काम , क्षमता या बाबींवर मुल्यांकन केले जाईल .

हे पण वाचा : NPS धारक राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण GR निर्गमित ..

इतर देय भत्ता प्राप्तीकरीता स्पष्ट पुरावे : सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी घरभाडे भत्ता , वाहन भत्ता तसेच प्रोत्साहन भत्ता अशा प्रकारचे भत्ते दिले जाते , याकरीता कर्मचाऱ्यांना यापुढे संबंधित ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे .

परीक्षा : नविन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे कार्यक्षमता वाढावी याकरीता कार्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रतिवर्षी परीक्षांचे आयोजन करण्यात येईल .

अभ्यासक्रम : नुकेतच केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार , केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती करीता ऑनलाईन अभ्यासक्रम पुर्ण करावे लागणार आहेत . यांमध्ये एकुण 6 अभ्यासक्रम असणार आहेत , सेवा कालावधीनुसार सदर अभ्यासक्रमांचे विभाजन करण्यात आले आहेत.

सदर अभ्यासक्रम ऑनलाईन रित्या पुर्ण करावे लागेल , अन्यथा पदोन्नती मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहेत .

Leave a Comment